
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, एअर इंडियाचे विमान डॉक्टर्स हॉस्टेलच्या वर कोसळले. घटनेनंतर दोन-तीन मिनिटांत पोलिस आणि इतर पथके तिथे पोहोचली. या इमारतीवर एअर इंडियाचे विमान कोसळले. डाॅक्टर्स जेवत असताना, ही घटना घडल्यामुळे एकच हल्लकल्लोळ उडाला.
अहमदाबादमधील ज्या डॉक्टर हॉस्टेलमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले त्याचे फोटो समोर आले आहेत. पोलिसांनी विमान या इमारतीवर पडल्याची पुष्टी केली. अपघातग्रस्त विमानात 242 प्रवासी होते. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते.
विमानाने दुपारी 1.17 वाजता उड्डाण केले. धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमान कोसळले. विमान लंडनला जात होते. घटनेनंतर एनडीआरएफच्या तीन पथके घटनास्थळी पोहोचली. क्षणार्धात विमान आगीच्या गोळ्यात बदलले. धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमान कोसळले. विमान लंडनला जात होते. घटनेनंतर एनडीआरएफच्या तीन पथके घटनास्थळी पोहोचली. विमानात 169 हिंदुस्थानी, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि एका कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता. विमानाच्या वैमानिकाचे नाव क्लाइव्ह होते. विमानात दोन मुलांसह 232 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्स होते.