
देशाला हादरवणाऱया अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर आले आहे. विमानाच्या पंखांचे फ्लॅप्स उघडले न गेल्याने हा अपघात झाला. अपघाताची घटना रिक्रिएट केल्यानंतर एअर इंडियाच्या वैमानिकांनी तांत्रिक बिघाडाच्या प्राथमिक शक्यतेवर शिक्कामोर्तब केले. अहमदाबादहून लंडनला निघालेले एअर इंडियाचे बोईंग विमान उड्डाणानंतर काही क्षणांतच कोसळले होते. या अपघातात 242 प्रवाशांसह अन्य 34 नागरिकांचा मृत्यू झाला होता.