Ahmedabad Plane Crash- शेवटच्या 10 मिनिटांचे रेकॉर्डींग झालेच नाही, वीजपुरवठ्या थांबल्याने ब्लॅक बॉक्स बंद झाल्याची धक्कादायक माहिती उघड

अहमदाबाद येथून लंडनला उड्डाण घेतलेले विमान काही क्षणांत एका वैद्यकीय वसतीगृहाच्या इमारतीवर कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत तब्बल 290 जणांचा मृत्यू झाला. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्सची तपासणी केली जात आहे, परंतु अपघातापूर्वी शेवटच्या 10 मिनिटांत ब्लॅक बॉक्सचे रेकॉर्डींग थांबल्याची धक्कायक माहिती उघड झाली आहे.

अपघात झाल्यानंतर 10 मिनिटांपर्यंत प्रत्येक संभाषण, तांत्रिक समस्या ब्लॅक बॉक्समध्ये नोंदवली जाते, परंतु एआय-171 कोसळल्यानंतर असे काहीच घडले नाही.

महत्त्वाचे पुरावे गहाळ

बोईंग 787 सारख्या विमानांमध्ये पुढच्या बाजूला असलेल्या एन्हांस्ड एअरबोर्ड फ्लाइट रेकॉर्डरमध्ये रिप्स ही यंत्रणा असते, परंतु अहमदाबादमध्ये अपघाग्रस्त झालेल्या विमानाच्या व्रॅश लँडिंगममुळे रिप्समधून रेकॉर्डरला होणारा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची माहिती आणि पुरावे गहाळ झाल्याचे समोर आले आहे. यामुळे ब्लॅक बॉक्स आणि कस्टडी चेनची विश्वासार्हता आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे, अशी प्रतिक्रिया विमान वाहतूक पंपनी सेफ्टी मॅटर्सचे संस्थापक अमित सिंह यांनी दिली.