
देशभर पसरलेल्या कोरोना विषाणूने गुजरातला मात्र भयानक चिंतेत लोटले आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज मोठी भर पडत असून अहमदाबादेत तर रुग्णांचा आकडा अवघ्या तीन दिवसात दुप्पट होत आहे. रुग्णसंख्या याच वेगाने वाढत राहिली तर 31 मेपर्यंत एकट्या अहमदाबादेतील कोरोनाग्रस्तांच्या आकडा तब्बल आठ लाखांवर जाण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव रोखायचा कसा याचे मोठे टेन्शन अहमदाबाद पालिका प्रशासनाला आले आहे.
हे वाचलेत का ?- कही खुशी कही गम! देशात सर्वाधिक रुग्ण बरे झाले पण नाव या रुग्णांचा उच्चांकही
हे पाहिलेत का ?- कोरोनाग्रस्तांची संख्या गुजरातमध्ये झपाट्याने वाढली
गुजरातमध्ये आतापर्यंत कोरोनाचे सव्वाशेहून अधिक रुग्ण आढळले आहे. त्यातील तब्बल एक हजार 652 रुग्ण हे एकट्या अहमदाबाद शहरातील आहेत. अहमदाबाद पालिकेचे आयुक्त विजय नेहरा त्यांनी कोरोना ग्रस्तांच्या संख्या वाढीची धक्कादायक माहिती उघड केली आहे. मेहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदाबादेत 17 एप्रिलला कोरोनाचे 600 रुग्ण होते. पुढील तीस दिवसात हा आकडा दुप्पट म्हणजेच बाराशेवर गेला. सुरुवातीला येथील रुग्ण संख्या चार दिवसात दुप्पट होत होती आता अवघ्या तीन दिवसांत रुग्ण संख्या दुप्पट होत आहे. हेच प्रमाण कायम राहिल्यास 15 मेपर्यंत पन्नास हजार रुग्ण आणि 31 मेपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल आठ लाखांवर जाण्याची दाट शक्यता आहे.
गुजरातमध्ये एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2624 वर गेली आहे. त्यातील 112 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या अहमदाबादमध्ये 1652 रुग्ण आढळले असून एकूण 70 जणांना प्राण गमवावा लागला आहे. अहमदाबाद पाठोपाठ सुरत मध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे. या ठिकाणी 456 कोरोनाग्रस्त असून 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे राज्यातील सर्व 33 जिल्ह्यांमध्ये करण्याचे रुग्ण आहेत.























































