
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच ढगाळ हवामान व धुके पडल्यामुळे पिकांवर रोगराईच्या प्रमाणात वाढ झालेली सध्यातरी दिसू लागली आहे.
2022 या नवीन वर्षाची सुरुवात ही पहिल्या दिवसापासून धुक्याने झाली होती. त्यानंतर गेल्या 15 दिवसांपासून तिसऱयांदा मोठय़ा प्रमाणात धुके पडल्यामुळे शेतामधील हरभरा, गहू, कांदे, इतर पालेभाज्या व जनावरांसाठी उपयुक्त असणाऱया घासाच्या पिकावर या ढगाळ हवामानामुळे व धुक्यामुळे मावा पडल्याचे दिसून आले आहे. यामुळे शेतकऱयांमध्ये फवारणी करताना धावपळ होत आहे.
कोरोना या महामारीतून बळीराजा कसाबसा बाहेर निघत असताना, अशा एक ना अनेक संकटांना सध्या शेतकरीवर्ग सामोरा जात आहे. द्राक्ष, डाळिंब यांसारख्या पिकांवरही मोठय़ा प्रमाणात फळांवर डाग व ठिपके सध्या दिसून येत आहेत. याचा मोठा फटका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सर्वच घटकांना बसत आहे. खर्च जास्त व उत्पन्न कमी अशी काहीशी अवस्था सध्या शेतकऱयांची झालेली पाहावयास मिळत आहे.



























































