
सामना प्रतिनिधी । नगर
नगर महानगरपालिकेसाठी दाखल शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 12 मधील उमेदवार बाळासाहेब बोराटे यांचा उमेदवारी अर्ज संभाजीनगर खंडपीठात वैध ठरवला आहे. यानंतर नगर येथील कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.
बाळासाहेब बोराडे यांच्या विरोधात अनधिकृत टॉवरचा विषय घेऊन राष्ट्रवादीने तक्रार दाखल केली होती. बोराडे यांच्या विरोधात नगर येथे निकाल लागला. त्यांनी संभाजीनगर खंडपीठामध्ये आव्हान दिल्यानंतर सोमवारी त्याच्यावर सुनावणी झाली. संभाजीनगर खंडपीठाने त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवल्यानंतर येथील माळीवाडा भागांमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.
भाजपला कही खुशी कही गम
भाजपचे सुवेंद्र गांधी, दिप्ती गांधी, प्रदिप परदेशी तसेच राष्ट्रवादीचे डॉ. योगेश चिपाडे यांचा अर्जही वैध ठरवण्यात आला असून भाजपचे सुरेश खरपुडे यांचा अर्ज मात्र बाद ठरवण्यात आला आहे.

























































