नगर – गळफास घेऊन शेतकर्‍याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वत: च्या शेतातील चिंचेच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन शेतकर्‍याने आत्महत्या केली. दिलीप हरीभाऊ वाघ (वय 57 रा. हातवळण ता. नगर) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. रविवारी (दि. 3) सकाळी ही घटना उघडकीस आली.

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दिलीप हरीभाऊ वाघ यांनी त्यांच्या हातवळण शिवारातील शेतात चिंचेच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस येताच त्यांना नातेवाईक निवृत्ती वाघ यांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, तेथील डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले. दिलीप वाघ यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली याचा शोध पोलीस घेत आहेत.