सलग दुसऱ्या दिवशी नगरमध्ये पावसाची हजेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलग दुसऱया दिवशी नगर शहरासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज दुपारनंतर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. आतापर्यंत नगर जिल्ह्यामध्ये 39.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या आठवडय़ात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. यावेळी मान्सून वेळेवर येणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले होते. नगर जिल्ह्यामध्ये सलग दोन दिवस बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. धरण क्षेत्रामध्येही पाऊस सुरू झाला आहे. या पावसाने बळीराजा सुखावला आहे.

तालुकानिहाय सरासरी पाऊस ः श्रीगोंदा 70.1 मि.मी., शेवगाव 65.1, कर्जत 55.1, नगर 37.6, पारनेर 49.4, कर्जत 55.1, जामखेड 20.6, पाथर्डी 49.1, नेवासा 17.3, राहुरी 12, संगमनेर 25.9, अकोले 55.1, कोपरगाव 46.1, श्रीरामपूर 13.5, राहता 28.0 मि.मी.

नगरमध्ये दमदार

शनिवारी रात्री नगर शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. दोन तास सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. गटारे तुंबल्यामुळे रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात पाणी साठले होते. ठिकठिकाणी रस्त्यांना तळय़ाचे स्वरूप आले होते.