
आर्टिफिशयल इंटेलिजन्स अर्थात एआयमुळे नोकऱ्यांवर परिणाम होईल, अशी भीती अनेक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सतावत आहे. एआयचा थेट परिणाम काही नोकऱ्यांवर नक्कीच होणार आहे. तर काही नोकऱ्यांवर याचा परिणाम होणार नाही, असे चित्र सध्या दिसत आहे. भविष्यात कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका आहे.
डेटा एन्ट्री, बेसिक क्लेरिकल, बेसिक बीपीओ, टेलिमार्केटिंग, ट्रान्सक्रिप्शन, बॅक ऑफिस प्रोसेसिंग, बुक किपिंग, बेसिक कंटेट रायटिंग, एसईओ, टेम्पलेट बेस्ड कोडिंग, बेसिक टेस्टिंग, एमआयएस रिपोर्टिंग, या नोकऱ्यांना सर्वात जास्त एआयचा धोका आहे. त्यानंतर सर्वात जास्त धोका ज्युनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर, बेसिक ग्राफिक डिझाईन, व्हिडीओ एडिटिंग, कॅशियर, वेअरहाऊस पॅकिंग, बेसिक लीगल ड्राफ्टिंग, बेसिक फायनान्स अॅनालिसिस, ट्रॅव्हल एजंट बुकिंग, बँक प्रोसेसिंग स्टाफ, मध्यम धोका असलेल्या नोकऱ्यांमध्ये रिटेल सेल्स एग्झिक्यूटिव्ह, मॅन्युफॅक्चरिंग मशीन ऑपरेटर, लॉजिस्टिक्स प्लानिंग, आयटी सपोर्ट, एचआर ऑपरेशन, डिजिटल मार्पेटिंग एग्झिक्युशन, इन्शूरन्स प्रोसेसिंग, कॉल सेंटर अडवॉन्स्ड सपोर्ट, अकाउंटिंग. कमी धोकादायक नोकऱ्यांमध्ये शिक्षक, नर्स, फिल्ड सेल्स, बिझनेस अॅनालिस्ट, प्रोडक्ट मॅनेजर, कंस्ट्रक्शन सुपरवायझर, चार्टर्ड अकाउंटंट, फार्मा सेल. तर सर्वात कमी धोकादायक नोकऱ्यांमध्ये डॉक्टर, सर्जन, सायकोलॉजिस्ट, थेरेपिस्ट, इलेक्ट्रिशियन, प्लम्बर, मॅकेनिक, संशोधक, सायंटिस्ट, डिफेन्समध्ये नोकरी करणारे कर्मचारी.


























































