
दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमने कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने क्षेत्ररक्षक म्हणून एका सामन्यात सर्वाधिक 9 झेल पकडत विश्वविक्रम आपल्या नावावर केला. कसोटी क्रिकेटच्या दीडशे वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी एकाही क्षेत्ररक्षकाला जमली नव्हती. या कामगिरीसह त्याने अजिंक्य रहाणेचा 8 झेलांचा विक्रम मोडीत काढला. सामन्यानंतर मार्करमने संघाच्या एकत्रित प्रयत्नांचे कौतुक करताना सांगितले की, हिंदुस्थानमध्ये 2-0 ने मालिका जिंकण्यासाठी आम्ही आधीच आखलेली रणनीती, वेगवान व फिरकी गोलंदाजीवर दिलेले विशेष लक्ष आणि कठीण परिस्थितीत संघाने दाखवलेला संयम यांचा मोठा वाटा आहे. त्याने विशेषतः सायमन हार्मर आणि सेनुरन मुथुसामी यांच्या भेदक गोलंदाजीचा उल्लेख केला.
























































