पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये 25 हून अधिक पदके जिंकण्याचे ध्येय – अध्यक्ष देवेंद्र झाझरिया

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 19 पदके आणि आशियाई पॅरा क्रिडा स्पर्धांमध्ये 111 पदके जिंकल्यानंतर, हिंदुस्थानी संघ पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये आपली जादू दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत. तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, कॅनोइंग, सायकलिंग, अंध ज्युडो, पॉवरलिफ्टिंग, रोईंग, नेमबाजी, स्वीमिंग, टेबल टेनिस आणि तायक्वांडो यासह 12 खेळांसाठी हिंदुस्थानकडून 84 खेळाडू पाठवत आहे. हिंदुस्थानी पॅरालिम्पिक समितिचे अध्यक्ष देवेंद्र झाझरिया यांनी याबाबत माहिती दिली आहे.

या खेळांडूमध्ये काही जुन्या खेळांडूसोबत नवे खेळाडू देखील सामिल झाले आहेत. यापैकी बरेच जण दुसऱ्यांदा तर काही तिसऱ्यांदा पॅरालिम्पिकचे सामने खेळणार आहेत. तर अमित कुमार सरोहा F51 डिस्क थ्रो प्रकारात पॅरालिम्पिकमध्ये चौथ्यांदा हिंदुस्थानचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तसेच 2023 आशियाई पॅरा क्रिडा स्पर्धा सुवर्णपदक विजेती हिंदुस्थानकडून सर्वात तरूण खेळाडू शीतल देवी ही देखील तिरंदाजीमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधीत्व करणार आहे. त्यामुळे या पॅरालिम्पिकमध्ये 25 हून अधिक पदके जिंकण्याची आशा असल्याचे हिंदुस्थानी पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष देवेंद्र झाझरिया यांनी सांगितले आहे.