Air India Plane Crash- अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी

गुरुवारी अहमदाबाद विमानतळाजवळ अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी असल्याचे मानले जात आहे. दुपारी अहमदाबाद विमानतळाजवळ उड्डाण केल्यानंतर, लगेचच लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले. बोईंग 787 – 8 ड्रीमलाइनर या विमानात 242 प्रवासी होते. 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. अपघात झाल्यानंतर, काही क्षणांमध्येच आजूबाजूचा परीसरात काळा धूर पसरला होता. या विमानामध्ये India Today ने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी या विमानात असल्याचे वृत्त आता समोर आलेले आहे.

या विमानात विजय रुपाणी बिझनेस क्लासमधून प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. ते त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी लंडनला जात होते. त्यांच्या पत्नी आणि मुलीसह त्याचे अनेक नातेवाईक लंडनमध्ये राहतात.

विजय रुपाणी हे 2016 ते 2021 पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री राहिले आहेत. आनंदीबेन पटेल यांच्यानंतर विजय रुपाणी  यांनी 7 ऑगस्ट 2016 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी राजकोट पश्चिम मतदारसंघातून आपला विजय कायम ठेवला आणि मुख्यमंत्रीपदावर राहिले. ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री झाले.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, विमानात असलेल्या 242 जणांमध्ये दोन पायलट आणि 2 मुलांसह 8 क्रू मेंबर्सचा समावेश आहे.