विमान प्रवास महागणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाचे दर वाढल्याने विमान इंधन दरात शुक्रवारी 8.15 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे विमान प्रवास आता महागण्याची चिन्हे आहेत. सार्वजनिक कंपन्यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार दिल्लीतील विमान इंधनाचा दर 8.15 टक्के म्हणजेच प्रतिकिलोलिटरमागे 4 हजार 734.15 रुपयांनी वाढून तो 62 हजार 795.12 रुपये झाला आहे. विमान इंधन दरात गेल्या चार महिन्यांत प्रथमच वाढ झाली आहे.