विमानात गोंधळ घालाल तर थेट प्रवासबंदी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
airoplane

विमानात आक्षेपार्ह वर्तन किंवा गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांना विमान कंपन्या आता थेट 30 दिवसांसाठी बंदी घालू शकतील. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) विमानात गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांबाबत कठोर नियमावली करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार अशा प्रवाशांवर थेट कारवाई करण्याचे अधिकार विमान कंपन्यांना देण्याचा डीजीसीएचा विचार आहे.

सध्याच्या नियमांनुसार, विमानात गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांबाबत तक्रार केल्यानंतर समितीमार्फत चौकशी व्हायची. त्यानंतर संबंधित प्रवाशांवर 45 दिवसांची बंदी घालण्याची परवानगी मिळायची. आता कारवाईसाठी कोणत्याही समितीची गरज राहणार नाही. विमान, प्रवाशी तसेच मालमत्तेची सुरक्षा निश्चित करणे, हा नव्या नियमांचा हेतू असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.