एअरटेल ऍप असुरक्षित, कंपनीनेच केले मान्य

967

देशातील तिसर्‍या क्रमांकावरील एअरटेलने मोबाईल कंपनी शनिवारी स्वतःचे ऍप सुरक्षित नसल्याचे मान्य केले आहे. ऍपमधील ‘ऑप्लिकेशन प्रोग्रॅम इंटरफेस’ (एपीआय)मध्ये बग असल्याचे समोर आले असून यामुळे हॅकर्सकडून कोट्यवधी युजर्सच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे त्यांची वैयक्तिक माहिती हॅक होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

एअरटेलच्या प्रवक्त्यांकडून सध्या तरी ऍपमधील बगची समस्या दूर झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच युजर्सचा डेटा लीक झाल्याची तक्रारही समोर आलेली नाही. मात्र या बगमुळे कोट्यवधी युजर्सचे नाव, ईमेल आयडी, जन्मदिनांक आणि घरचा पत्ता आदी माहिती लीक होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या