मनोज जरांगेविरोधात रविवारी बॉम्ब टाकणार, ईडीकडेही जाणार – अजय बारसकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनोज जरांगे पाटील यांना कोणाला आमदार बनवणार आहेत, याचे पुरावे आपल्याकडे असून त्यांच्याविरोधात रविवार 25 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता आपण बॉम्ब फोडणार असल्याचं अजय बारसकर यांनी म्हटलं आहे. तसंच, जरांगे पाटील यांच्या नातेवाईकांची चौकशी करण्यासाठी आपण ईडीकडेही जाणार आहोत, असंही अजय बारसकर यांचं म्हणणं आहे.

जरांगे पाटील यांच्यावर आरोप करताना बारसकर म्हणाले की, मी महाराज आणि वकील पण आहे. माझ्याकडे त्यांच्याविरोधात पुरावा असून मनोज जरांगेंची रेकॉर्डिंग आहे, मनोज जरांगे पाटील यांनी लोणावळ्यात बंद दाराआड का मीटिंग घेतली? असा मी प्रश्न विचारला. बंद दाराआड तुमची काय डील झाली? 14 तारखेला जी सभा झाली त्यामध्ये जरांगे पाटील यांनी सहा मागण्या केल्या होत्या. त्या सभेमध्ये तुम्ही समाजाची मागणी मान्य केली. लोणावळामध्ये सरसकट शब्द सोडून दिले. बंद दाराआड बैठक झाल्यानंतर लोणावळामध्ये सरसकट शब्द का सोडला? अंतरवाली येथील मागणीमध्ये ज्या 45 बांधवांनी आत्महत्या केली त्यांच्यासाठी सरकारी नोकरी का सुटली? असे प्रश्न बारसकर यांनी विचारले आहेत.

2017 मध्ये जरांगे पाटील यांची मागणी ओबीसींपेक्षा वेगळ्या आरक्षणाची होती. पण, आता ती कुणबी आरक्षणाच्या मागणीत बदलली, असं सांगताना त्यांनी जरांगे यांच्यावर पुण्यात फसवणुकीचे आरोप असल्याचा दावाही केला आहे.