अजय देवगणचे हजारोंनी सोशल मीडियावर डुप्लिकेट आहेत? या प्रश्नावर काजोल काय म्हणाली, वाचा

एखादा कलाकार लोकांना आवडू लागला की, त्याची स्टाईल आणि फॅशन फार मोठ्या प्रमाणावर फाॅलो केली जाते. मग त्या कलाकाराची हेअर स्टाइल फाॅलो केली जात नाही, तर त्याला तंतोतंत फाॅलो करणारे अनेकजण आपल्याला दिसतात. बाॅलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे डुप्लिकेट आपल्याला सोशल मीडियावर दिसतात. सलमान खान, शाहरुख खान, अजय देवगण इ. अनेक कलाकारांचे डुप्लिकेट आपल्याला पाहायला मिळतात.

नव्वदच्या दशकामध्ये अजय देवगणचे फॅन्स अख्ख्या हिंदुस्थानात होते. अजय देवगणच्या स्टाईलची चर्चा ही सर्व ठिकाणी चर्चेचा विषय असायची. अजयची हेअर स्टाईल असो किंवा त्याची फॅशन असो सर्व गोष्टींची चर्चा खूप व्हायची. असं असलं तरी, अजय देवगणचे डुप्लिकेट हे आपल्याला सोशल मीडियावर खंडीभर पाहायला मिळतात. अजयच्या गाण्याची मिमिक्री त्याचजोडीला अभिनयाची मिमिक्री सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात करणारे आहेत.

अजय देवगणचा आता माझी सटकली हे वाक्य इंटरनेटवर खूप प्रसिद्ध आहे. याचबरोबरीने देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे, तर त्यातले दोन कोटी अजय देवगणचे डुप्लिकेट आहेत, हाही मुद्दा सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. याच संदर्भात काजोलला एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला होता. यावर काजोल म्हणाली, “कुठे आहेत हे सर्व डुप्लिकेट? माझ्या घराच्या समोर तर नाहीयेत.

तुम्ही हा प्रश्न अजयला विचारा..पण तुम्ही मात्र हा डुप्लिकेटचा प्रश्न अजयला विचारणार नाही. नाहीतर त्या सिंघमची सटकेल. या मुलाखतीमध्ये काजोलला अजय देवगणच्या डुप्लिकेटचे फोटो दाखवल्यानंतर तिने सुंदर अशी या फोटोंवर प्रतिक्रिया दिली. अलीकडेच काजोल ही ‘माँ’ या चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट अजय देवगणने प्रोड्यूस केला होता.