
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःच्या मुलाचा पराक्रम पाहावा आणि नंतर आमच्यावर टीका करावी, पवार हे स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये आले असून तेच महाराष्ट्राचे आका असल्याचा पलटवार भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी अजितदादांवर केला आहे. तसेच पवारांनी आम्हाला शिकवू नये असे म्हणत त्यांना आव्हान दिले.
पिंपरी महापालिका प्रचाराला सुरुवात झाल्यापासून पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेतील भ्रष्टाचारावरून आणि महापालिका कर्जबाजारी केल्यावरून भाजपच्या स्थानिक नेत्यांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक जाहीर सभेत पवार पालिकेतील भ्रष्टाचार, दादागिरी, सत्तेची मस्ती असा उल्लेख करून भाजप नेत्यांना टार्गेट करत आहेत. त्यामुळे चिडलेल्या आमदार लांडगे यांनी आता पवार यांच्यावर पलटवार केला आहे.






























































