मुंबई पालिकेत महायुतीला पाठींबा हवा तर…एल वार्ड प्रभाग समितीचे अध्यक्षपद आम्हाला द्या, अजित पवार गटाची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेच्या सत्तेत आमची साथ हवी असेल तर एल वॉर्ड प्रभाग समितीचे अध्यक्षपद देण्यात यावे. तसेच एक स्विकृत नगरसेवकपद देण्यात यावे, अशी अट अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी महायुतीपुढे ठेवली आहे.

महानगरपालिका निवडणुकीत महायुतीपासून दूर ठेवण्यात आलेल्या अजित पवार गटाला सत्तेत सोबत घेण्याचा प्रयत्न भाजप आणि शिंदे गटाकडून केला जात आहे. शिंदे गटासोबत एकत्रित त्यांची नोंदणी करण्यात येणार होती. पण, मुंबई पालिकेत सत्ताधारी गटाला आमचा पाठिंबा हवा असेल तर आमच्या गटाला सत्तेत योग्य ते प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे अशी भूमिका अजित पवार गटाने घेतली आहे. एल वॉर्ड अध्यक्षपद, एक स्विकृत नगरसेवक आणि एखाद्या समितीवर प्रतिनिधित्व देण्याची अट ठेवण्यात आली आहे. मात्र, त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने शिंदे गटासोबत एकत्र नोंदणी करणे अजित पवार गटाने टाळल्याचे बोलले जात आहे.