सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांना मोठा दिलासा, वाचा सविस्तर बातमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ajit-pawar

सिंचन घोटाळ्यातील आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घोटाळ्यातून क्लिनचीट दिल्याचे वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिले आहे. ACB ने 27 नोव्हेंबरला एक प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रामुळे ही बाब उघडकीस आली आहे.

या प्रतिज्ञापत्रामध्ये ACB ने अनियमितता करणाऱ्या यंत्रणांनी केलेल्या गैरव्यवहाराप्रकरणी विदर्भ सिंचन विकास प्रकल्पाचे तत्कालीन अध्यक्ष अजित पवार यांनी दोषी धरता येणार नाही असे म्हटले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षकांनी हे प्रतिज्ञापत्रक दाखल केलं आहे. या प्रतिज्ञापत्रात अजित पवार यांच्याविरूद्ध कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नाही असे नमूद केलेले आहे असंही सांगण्यात येत आहे.