
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी पुढे आली आहे. या मागणीबाबत आम्ही एकत्र बसून विचार करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हरिद्वारमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांना या संदर्भात हा प्रश्न विचारण्यात आला.






























































