उत्तराखंडच्या चमोलीतील दुर्घटनेबद्दल अजित पवार यांच्याकडून दु:ख व्यक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडच्या चमोलीतील हिमकडा दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्र सरकार आणि जनता या संकटकाळात उत्तराखंडच्या पाठीशी असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

“उत्तराखंडच्या चमोली भागात हिमकडा कोसळून आलेल्या महापूरात शंभरहून अधिक जण वाहून गेल्याची घटना दु:खदायक आहे. या दुर्घटनेत वाहून गेलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मी प्रार्थना करतो. महाराष्ट्र सरकार आणि नागरिक, या संकटकाळात उत्तराखंड सरकारसोबत आहेत,” असे अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.