मी खिशात पैसे घेऊन बसतो का? अजित पवारांनी मिंधेंच्या मंत्र्यांना फटकारले

विधानसभेत विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली! ‘लोकसभेला आपला पराभव झाला. त्यामुळे विधानसभेला लोकांची नाराजी दूर करणं हे काम होतं. त्या वेळी ‘लाडकी बहीण’चा विचार समोर आला. विधानसभेत विजय मिळविण्यासाठी ‘लाडकी बहीण योजना’ आणली,’ अशी अप्रत्यक्ष कबुलीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

निधीवाटपावरून होत असलेल्या टीकेवर अजित पवार यांनी, ‘अरे, पैसे सोडत नाही म्हणतात… मी काय खिशात पैसे घेऊन बसतो का?’ अशा शब्दांत मिंधे गटाच्या मंत्र्यांना फटकारले. एकदा अर्थसंकल्प मांडला की, त्यासाठी टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातात, असेही त्यांनी सुनावले.