
‘गोड गणपती’ अशी ख्याती असलेल्या अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा 48 वे वर्ष साजरे करत आहे. मंडळाच्या गणरायाची विलोभनीय मूर्ती विठ्ठलाच्या रूपात असून पृथ्वीवर आरूढ आहे. 26 फूट उंचीची ही भव्यदिव्य मूर्ती मूर्तिकार सिद्धेश दिघोळे यांनी साकारली आहे. मंडळाने यंदा पंढरपूरचा पालखी सोहळा, रिंगण सोहळा व विठुरायाच्या दर्शनाचे सुंदर चलचित्र सादर केले आहे.