SIR प्रक्रियेदरम्यान जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची भरपाई मिळावी, अखिलेश यादव यांची मागणी

उत्तर प्रदेशात आणखी एका बीएलओच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेशात पाच बीएलओचा मृत्यू झाला आहे. तीन मृत्यू प्रकृती अस्वास्थ्यामुळे झाले आहेत आणि दोन आत्महत्यांमुळे झाले आहेत. यातच आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या आत्महत्येला निवडणुकीशी संबंधित कामाच्या ताणाचे दुःखद परिणाम असल्याचे म्हटले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबाला निवडणूक आयोगाकडून १ कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

अखिलेश यादव म्हणाले की, “उत्तर प्रदेशात एसआयआर दरम्यान मानसिक आणि शारीरिक दुखापतींमुळे जीव गमावणाऱ्यांना निवडणूक आयोगाने १ कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी विनंती आहे. आम्ही प्रत्येक मृतांच्या आश्रितांना २ लाख रुपयांची मदत देण्याचेही वचन देतो.”

दरम्यान, आतापर्यंत अनेक राज्यांनी एसआयआर प्रक्रियेदरम्यान बीएलओंच्या मृत्यूची नोंद केली आहे. एकट्या पश्चिम बंगालमध्ये २३ बीएलओंचा मृत्यू झाला आहे.