
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व खासदार अखिलेश यादव यांनी आज लोकसभेत केंद्र सरकारला ऑपरेशन सिंदूरबाबत कठोर सवाल विचारला. युद्धविराम जाहीर करण्यामागचं कारण काय होतं? युद्धविराम कोणत्या दबावाखाली जाहीर करण्यात आला? असा थेट प्रश्न त्यांनी सरकारला विचारला. लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं.
अखिलेश यादव म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना मला आनंद आहे की, विरोधकांचं अभिनंदन केलं जात आहे, पण सत्ताधारी पक्षाचे कोणीही अभिनंदन करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मी जगाला समजावण्यात गुंतलो आहे, पण माझं घर माझ्यावर रुसत आहे. हे मी भाजपसाठी बोलतोय.”
अखिलेश यादव म्हणाले, “ऑपरेशन सुरू असताना काही वृत्तवाहिन्यांनी तर असं सांगितलं की, कराची आपलं झालं. कोणी म्हणालं (योगी आदित्यनाथ ) होतं की, सहा महिन्यांचा वेळ मिळाला तर पीओके आपलं होईल. यांची मैत्री खूप (ट्रम्प यांच्याशी) आहे. त्यांनी त्यांच्या मित्रालाच सांगितलं, तुम्हीच युद्धविराम जाहीर करा, आम्हाला काही काम नाही. युद्धविराम जाहीर करण्यामागचं कारण काय होतं? कोणत्या दबावाखाली युद्धविराम झाला?” असा प्रश्न त्यांना विचारला.