
पोलीस भरती सरावासाठी घरुन निघत असतानाच कूलरचा शॉक लागल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अकोल्यात घडली. रोहित विठ्ठल बावस्कर असे मयत तरुणाचे नाव आहे. अकोल्यातील कान्हेरी सरप येथे ही घटना घडली. या घटनेमुळे बावस्कर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रोहित पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता. त्यासाठी दररोज तो पहाटे 4 वाजता सरावासाठी जात असे. नेहमीप्रमाणे सोमवारी पहाटे 4 वाजता तो पोलीस भरती सरावासाठी चालला होता. मात्र नियतीच्या मनात वेगळंच होतं. पायात बूट घालत असताना रोहितला कूलरचा शॉक लागला. यात रोहितचा जागीच मृत्यू झाला.