अक्षय कुमारच्या ‘रामसेतू’चा टीझर प्रदर्शित, पाहा व्हिडीओ

अक्षय कुमार अभिनित राम सेतू या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. रामसेतू – सत्य की कल्पना? अशी या चित्रपटाची टॅग लाईन आहे. पोस्टरवर संशोधकाच्या वेशभूषेतील अक्षय कुमार दिसत आहे. हा चित्रपट हिंदुस्तान आणि श्रीलंका या दोन देशांमधील सामुद्रधुनीमध्ये दिसणाऱ्या पुलावर आणि त्याच्या शोधावर बेतली आहे.

या चित्रपटात अक्षय कुमार आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘राम सेतु’चा टीझर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये अक्षयचा एक नवा लूक पाहायला मिळत आहे. काही सेकंदाच्या या टीझरमध्ये दमदार अ‍ॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत. तसेच चित्रपटाचा टीझर पाहून हा बिग बजेट चित्रपट असल्याचं दिसून येतं. “राम सेतू को बचाने के लिए हमारे पास सिर्फ तीन दिन है” या अक्षयच्या संवादाने टीझरची सुरुवात होते. त्यानंतर धमाकेदार अॅक्शन्स पाहायला मिळत आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केलं आहे. अभिनेत्री नुसरत भरुचाही चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट येत्या 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.