
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सुरक्षा कारला अपघात झाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. या अपघातात रिक्षाचालक आणि एक प्रवासी जखमी झाला आहेत. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घडल्याप्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हे सोमवारी रात्री वाहनाने त्याच्या जुहू येथील घरी जात होते. अक्षय कुमारसोबत त्याची खासगी सुरक्षा आहे. रात्री अक्षय कुमारचे वाहन जुहू परिसरातील मुत्तेश्वर रोड येथे आले. खासगी सुरक्षा रक्षक हे दुसऱया वाहनातून जात होते. अक्षय कुमारच्या सुरक्षा ताफ्यात असलेले वाहनाने दुसऱया वाहनाला धडक दिली. दुसऱया वाहनाने रिक्षाला जाऊन धडक दिली. त्यात रिक्षा पलटी झाली.
या घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी येऊन अपघातग्रस्त वाहन बाजूला काढले. त्यात रिक्षाचालक आणि एक प्रवासी जखमी झाला. ते दोघे रिक्षाखाली अडकले गेले. रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अपघाताची माहिती समजताच जुहू जुहू पोलिसांनी वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.


























































