‘अल कायदा’चा दहशतवादी जेरबंद; मदरशात रचत होता कट

355
Ranchi: Al-Qaeda terrorist Mohammad Kalimuddin Mujahiri, arrested by Anti Terrorist Squad (ATS) from Azad Nagar in Jumshedpur district, being taken to a press conference in Ranchi, Sunday, Sept. 22, 2019. (PTI Photo) (PTI9_22_2019_000031B)

‘अल कायदा’चा मोस्ट वॉण्टेड दहशतवादी कलिमुद्दीन मुजाहिरी याला अखेर झारखंडच्या जमशेदपूर परिसरातून जेरबंद करण्यात आले. तो मदरशात राहून दहशतवादी कारवायांचे कट-कारस्थान रचत होता. तीन वर्षांपासून फरार असलेल्या मुजाहिरीचा पोलीस कसून शोध घेत होते. त्याला शनिवारी टाटानगर रेल्वे स्थानकातून ताब्यात घेण्यात आले. दहशतवादी कारवाया थोपवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. त्याच अनुषंगाने ‘अल कायदा’चा मोस्ट वॉण्टेड दहशतवादी असलेला मुजाहिरी पोलिसांच्या रडारवर होता. दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) तीन वर्षांपासून त्याचा शोध घेतला जात होता. मुजाहिरी हा जमशेदपूरमधील रहिवाशी आहे. विविध दहशवादी कारवायांमध्ये त्याचा हात आहे. त्याचे साथीदार मोहम्मद अब्दूल रहमन अली ऊर्फ हैदर ऊर्फ कतकी, अब्दुल सामी ऊर्फ उज्जन ऊर्फ हसन हे दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या