
प्रादेशिक हवामान विभागाने राज्याच्या किनाऱ्यालगत असलेल्या मच्छिमारांना सतर्कतेचा तसेच समुद्रात न जाण्याबाबत इशारा दिला आहे. त्या अनुषंगाने देवगड बंदरात सुमारे 140 हून अधिक परप्रांतीय नौका देवगड बंदरात आश्रयास आल्या आहेत.
नौका अधिस्तीत नौका मालक व मच्छिमारांनी दोन दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वाहणार असून त्यांचा वेग 60 किमी प्रतिसासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमारीसाठी मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये वादळी वाऱ्यासह पावसाचीही शक्यता आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यांचा वेग ओसरेपर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही नौकांनी या कालावधीत समुद्रात जाऊ नये, असा इशारा सहा. आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग मालवण यांच्याकडून देण्यात आला होता.



























































