मध्य महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

यंदा म़ॉन्सूनने वेळेत आणि दमदार आगमन केल्याने बळीराजा सुखावला आहे. मॉन्सून आता राज्यात सर्वदूर दाखल झाला असला तरी काही जिल्ह्यांना पेरणीसाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आठवड्याभरापासून मॉन्सूनची पुढील वाटचाल मंदावली होती. उत्तरेकडे सरकरण्याचा त्याचा वेगही कमी झाला होता. मात्र, आता येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज हावामान खात्याने वर्तवला आहे.

नाशिक,पुणे,नंदूरबार,धुळे, जळगाव आणि नगर जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वारे वाहणार आहेत. त्यांचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रतीतास असेल. तसेच काही ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता आहे. गुरुवार आणि शुक्रवारी या भागात वादळी वाऱ्यासह मूसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण आणि किनारपट्टीच्या भागातही तुरळक पाऊस पडणार आहे. तसेच उत्तर हिंदुस्थानकडे पुढील वाटचालीसाठी मॉन्सूनला पोषक वातावरण असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या