
सामना ऑनलाईन । मुंबई
“दादी” या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या कॉमेडिअन अली असगरला दिल्लीतील एका लग्नाच्या कार्यक्रमात परफॉर्म करताना छेडछाड झाल्याची माहिती त्याने दिली आहे.
‘कपील शर्मा शो’ या कार्यक्रमातून अली गेली काही वर्ष लोकांसमोर येत आहे. कॉमेडिअन अली असगर याचा “कानपुर वाले खूरानास” हा शो येत आहे. त्यात त्याचा रोल “चाउथी” च्या विरोधात स्त्री भूमिका हा आहे. अली असगर यांनी आपण या स्त्री भूमिकेत किती कम्फरटेबल आहोत आणि खऱ्या आयुष्यात कसे आहोत, हे नूकतेच दिल्लीत आपल्या चाहत्यांशी बोलताना सांगितले.
अली दिल्ली मध्ये एका लग्नामध्ये परफॉर्म करायला गेले होते. तेव्हा त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा त्यांनी सांगितला. मी परफॅाम करायला जात होतो. जसा मी आत आलो तसे काही दारू प्यायलेल्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांनी थेट माझ्या छातीला हात लावला, पण त्यावेळी माझ्यासोबत गर्ल टीम होती म्हणून मी वाचलो. तेव्हा मला प्रश्न पडला होता की, ‘या लोकांना कल्पना तरी आहे की एक पुरुष स्त्रीची भूमिका साकारत आहे.’ आणि दुसरा प्रश्न असा होता की, ही जर एक वयस्कर स्त्री आहे, निदान तिला तरी सोडून द्या.
अली असगर यांनी त्यांचा अजून एक अनुभव सांगितला, जेव्हा द ड्रामा कंपनी चे शूट चालू होते, तेव्हा एका एपिसोडच्या वेळी जॅकलीन फर्नाडिस आली होती. तेव्हा मी, जॅकलीन फर्नाडिस, सूंगधा (मिश्रा), आणि अजून एक फिमेल आर्टिस्ट माझ्या सोबत होत्या, आणि आम्ही डान्स करत होतो. त्या डान्स करण्यामध्ये जॅकलीनचा माईक निघाला, बाजूला एवढ्या महिला असून देखील जॅकलीनने मलाच माईक तिच्या बॅक साईटला लावायला सांगितला, तर मी सांगितले की, मी एक मूलगा आहे, आणि हे बोलल्यावर, प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. बरेचदा लोक हे सांगू शकत नाही की, मी पुरुष आहे आणि मी एका स्त्रीचा रोल करतोय.
अलीचा अभिनय हा नेहमी नाविण्यपूर्ण असतो. मी स्त्री भूमिका साकारण्यासाठी अगदी कम्फरटेबल असतो, पण एक परफॉर्मर म्हणून मी हे ही काम करू शकतो, आणि मला यापेक्षा अजून चांगले काम करायचे आहे. हल्लीच मला एका प्रोडक्शन हाऊसकडून एक ऑफर आली. मी अशा नविन भूमिका करायला उत्साही आहे. पण हिथेही “दादी” या रोल साठीच काम करायचे आहे. अली असे म्हणाले की, यापुढे मी पुरुष ही भूमिका करुच शकत नाही का?, असा प्रश्न त्याला पडतो. अलीकडे 2-3 चित्रपट लाईनअप आहेत. आणि मी वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहे, असेही नंतर त्याने स्पष्ट केले.

























































