रेवदंड्यात पक्षीमित्रांचे संमेलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोर, कोकिळा असो की कावळा.. प्रत्येकालाच पक्ष्यांचे आकर्षण असते. या पक्ष्यांचा अभ्यास करणारे अनेक तरुण दिसून येतात. मात्र त्यांना व्यवस्थित दिशा मिळत नाही. नव्या पिढीमध्ये पक्ष्यांच्या अभ्यासाबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी  रेवदंडा येथे 11 व 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन भरविण्यात येणार आहे. हे 33 वे संमेलन असून राज्याच्या विविध भागातून असंख्य पक्षीमित्र उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. राजू कसंबे यांची निवड करण्यात आली आहे.

रेवदंडा येथे होणारे पक्षीमित्र संमेलन हे 33 वे असून महाराष्ट्रासह  अनेक राज्यांमधून एकूण 300 प्रतिनिधी उपस्थित राहतील, असा विश्वास  अमेझिंग नेचर संस्थेच्या पदाधिकाऱयांनी व्यक्त केला आहे. या पक्षीमित्र संमेलनाचे यजमानपद ‘अमेझिंग नेचर’कडे असून दोन दिवस चर्चासत्र, व्याख्यान, परिसंवाद होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. राजीव कसंबे हे नव्या पक्षीमित्रांना काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कसंबे हे गेली 22 वर्षे पक्ष्यांचा अभ्यास व संवर्धन यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी या क्षेत्रात संशोधनदेखील केले आहे.