नासाने एलियन्सच्या शोधात नवीन मोहीम हाती घेतली आहे. युरोपावर लपलेल्या विशाल महासागरात जीवसृष्टीचे पुरावे शोधण्यासाठी नासाने यान रवाना केले आहे. गुरू ग्रहावर पोहोचल्यानंतर युरोपा क्लिपर चंद्राच्या पृष्ठभागाभोवती 16 मैल अंतरावर झेप घेऊन युरोपाच्या 49 वेळा जवळून उड्डाण करेल.
ग्रहावर जीवसृष्टी आहे का? एलियन्स अस्तित्वात आहेत, जे विश्वात कुठेतरी राहतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मंगळावर याबाबत संशोधन सुरू आहे. त्यासाठी आता नासाने एलियन्सचा शोध घेण्यासाठी गुरूचा चंद्र युरोपावर नवीन मोहीम हाती घेतली आहे. युरोपावर लपलेल्या विशाल महासागरात जीवसृष्टीचे पुरावे शोधण्यासाठी नासाचे एक यान रवाना झाले आहे. एलियन्सच्या शोधात ‘युरोपा क्लिपर’ला गुरू ग्रहापर्यंत पोहोचायला साडेपाच वर्षे लागतील.
नासाचे अंतराळयान ‘युरोपा क्लिपर’ हे यान ग्रह गुरूभोवती कक्षेत प्रवेश करणार आहे. शास्त्रज्ञांना खात्री आहे की, युरोपावर असलेल्या बर्फाळ महासागराखाली जीवसृष्टीचे पुरावे असू शकतात, जिथे पाणी आणि जीवन असू शकते. ‘SpaceX’ने हे यान लॉन्च केले असून ते 18 लाख मैलांचा प्रवास करेल. फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून हे यान प्रक्षेपित करण्यात आले. या मोहिमेसाठी 5.2 अब्ज डॉलर्स इतका खर्च होणार आहे. हे रॉकेट 2030 पर्यंत युरोपावर पोहोचेल. मोहिमेदरम्यान ते युरोपाच्या पृष्ठभागाच्या 16 मैलांजवळ पोहोचेल. अंतराळयान तेथे उतरणार नाही, जरी ते त्याच्या चार वर्षांच्या कार्यकाळात सुमारे 50 वेळा त्याच्या जवळून जाईल.
संशोधनानुसार युरोपावर विशाल बर्फाचा महासागर आहे. त्यांना विश्वास आहे की, पृथ्वीवरच्या सर्व समुद्रांना एकत्र करून जेवढे पाणी आहे, त्याच्या दुप्पट पाणी युरोपामध्ये आहे. युरोपावर ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता असून त्यामुळे शास्त्रज्ञांना तेथे जीवसृष्टीची आशा निर्माण झाली आहे. युरोपा क्लिपर अंतराळयान जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी तयार केलेले नाही. गुरूच्या चंद्रावरील रासायनिक रचना, भूगर्भीय क्रियाकलाप, गुरुत्वाकर्षण, मॅग्नेशियम आणि इतर गोष्टींबद्दल माहिती गोळा करणे हा त्याचा उद्देश आहे. युरोपावरील वातावरण जीवनाला आधार देण्यासाठी योग्य आहे की नाही हे यावरून स्पष्ट होईल.
2024 मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेले युरोपा अंतराळयान 2030 पर्यंत गुरूग्रहावर पोहोचू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, हे अंतराळयान युरोपाजवळ सुमारे 49 वेळा फिरेल करेल. हे अतिशय कमी उंचीवरून युरोपाचे स्कॅनिंग करेल जेणेकरून गुरूच्या चंद्राविषयी सविस्तर माहिती मिळू शकेल.