सीएसएमटी आणि भायखळादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड, अप-डाऊन दोन्ही मार्गावरची वाहतूक ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
१८५७ मध्ये भायखळा हे रेल्वे स्थानक ब्रिटिशांनी बांधलं. धान्याचं गोदामाला खळे असे म्हणतात. भाया नावाच्या मालकाचं धान्याचं कोठार असल्याने भायखळे असं नाव झालं. त्याचच पुढे 'भायखळा' असं नावं झालं.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भायखळा स्थानकादरम्यानची अप आणि डाऊन या दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे ही वाहतूक ठप्प झाल्याचे कळते आहे. दोन्ही दिशेच्या धीम्या आणि जलद गतीच्या लोकल ट्रेन या बिघाडामुळे खोळंबल्या असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.