
अमरनाथ यात्रा 2025 साठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. ही यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होणार असून 19 ऑगस्टला संपणार आहे. आतापर्यंत जवळपास 3.6 लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. सुरक्षा एजन्सी आणि वैद्यकीय पथकांना तैनात केले जात आहे. सध्या या मार्गावर बर्फवृष्ठाr मोठे आव्हान बनले आहे. बालटाल आणि चंदनवारी मार्गावर 10 ते 20 फुटांपर्यंत बर्फ जमा झाले आहेत. त्यामुळे रस्ता स्वच्छ करणे कठीण जात आहे, परंतु प्रशासन आणि सुरक्षा एजन्सीकडून बर्फ हटवण्याचे काम वेगाने केले जात आहे.