अमरनाथ यात्रेची नोंदणी 15 पासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. विविध पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जात आहे. देशातील वातावरण निवडणूकमय झालेले असताना अमरनाथ यात्रा नोंदणीच्या तारखेची घोषणा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीमुळे अमरनाथ यात्रा दोन महिन्यांऐवजी केवळ 45 दिवस चालणार आहे. 15 एप्रिलपासून यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. राजभवन येथे चेअरमन आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत याची घोषणा करण्यात आली. जम्मू-कश्मीरमधील काही ठरावीक हॉस्पिटलमध्ये प्रवाशांसाठी हेल्थ सर्टिफिकेट जारी केले जातील. पारंपरिक बालटाल आणि पहलगाम रस्त्यांवरून दररोज 10-10 हजार प्रवाशांना पवित्र गुंफेतून जाण्याची परवानगी दिली जाते.