अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित! बालटाल मार्गावर भूस्खलन, एका यात्रेकरूचा मृत्यू 8 जण जखमी

खराब हवामानामुळे जम्मूहून अमरनाथ यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. गुरुवारी जम्मूहून पवित्र अमरनाथ गुहेसाठी यात्रेकरूंचा एकही नवीन गट रवाना होणार नाही. जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रेवर परीणाम झालेला आहे. बुधवारी (16 जुलै) बालटालमधील रेलपाथरी येथे मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात 8 यात्रेकरू जखमी झाले. शेकडो यात्रेकरूंना सुरक्षितपणे वाचवण्यात आले. राजस्थानमधील रहिवासी असलेल्या यात्रेकरू सोना बाई (55) यांना अप्पर रेलपथरी येथून बेशुद्ध अवस्थेत बेशुद्धावस्थेत बालटाल येथील बेस कॅम्प हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. तिथे मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

गुरुवारी (17 जुलै) खराब हवामानाचा अंदाज असल्याने, जम्मूहून अमरनाथ यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. गुरुवारी पवित्र अमरनाथ गुहेसाठी जम्मूहून यात्रेकरूंचा कोणताही नवीन गट रवाना होणार नाही. बालटाल मार्गावरील रेलपथरीजवळील झेड टर्नवर, पावसामुळे डोंगरावरून चिखलाचा राडारोडा यात्रा मार्गावर आले आहे. त्यामुळे मार्ग अडला असून, या घटनेत सुमारे 8 यात्रेकरू जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जवळच्या वैद्यकीय सुविधा केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अमरनाथ यात्रेदरम्यान प्रशासन हवामान आणि सुरक्षेकडे विशेष लक्ष देत आहे. स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा दल यात्रा सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. हवामान खात्याने गुरुवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे भूस्खलन आणि लॅंडस्लाईड होण्याचा धोका देखील आहे. यामुळे गुरुवारी जम्मू यात्री निवासातून अमरनाथ यात्रेसाठी एकही तुकडी रवाना होणार नाही. हवामान सुधारल्यानंतर प्रशासन भाविकांना येथून रवाना करेल. यापूर्वी, बालटाल मार्गाद्वारे पवित्र अमरनाथ गुहेत पोहोचण्यासाठी जम्मूहून 15 तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत.

बुधवारी पाऊस असूनही अमरनाथ यात्रेकरू पूर्ण उत्साहाने बालटाल मार्गावरून अमरनाथ गुहेकडे जात होते. दरम्यान रेलपथरीजवळील झेड टर्नवर मुसळधार पावसामुळे डोंगरावरून येणाऱ्या पाण्यासह मोठे दगड आणि ढिगारा ट्रॅकवर वाहून आला. त्यातच काही भाविक अडकले. राजस्थानमधील रहिवासी सोनाबाई यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना उपचारासाठी बालटाल बेस कॅम्प रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. इतर जखमींना तात्काळ वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या आहेत आणि ते धोक्याबाहेर आहेत.

दोन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी पहलगाम आणि बालटाल बेस कॅम्पमधून अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आल्याची घोषणा जम्मू आणि काश्मीर माहिती विभागाने केली आहे. अमरनाथ यात्रेदरम्यान बुधवारी झालेल्या पावसामुळे बालटालमधून भूस्खलन झाल्याची नोंद झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी बालटाल मार्गावरील रेलपाथरीजवळील झेड टर्नवर डोंगरावरून अचानक पावसाचे पाणी पडल्याने यात्रा मार्गावर भूस्खलन झाले. या भूस्खलनाच्या घटनेत राजस्थानमधील एका महिलेचा मृत्यू झाला. तिचे नाव ५५ वर्षीय सोना बाई असे आहे. त्याच वेळी, १० प्रवासी देखील जखमी झाले आहेत.