प्रतिबंधित क्षेत्रात वस्तू पोहचवण्यासाठी पालिकेला अ‍ॅमेझॉनचे सहकार्य

544

मुंबईमधील प्रतिबंधित क्षेत्रात रहिवाशांना आवश्यक वस्तू घरबसल्या मिळवून देण्यासाठी अ‍ॅमेझॉन पालिकेसोबत काम करणार आहे. यामध्ये अ‍ॅमेझॉन प्रतिबंधित क्षेत्रात नियुक्त करण्यात आलेल्या डिलिव्हरी पॉइंटवर वस्तू आणून देईल आणि या ठिकाणाहून स्वयंसेवक ती वस्तू ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवेल.

मुंबई कोरोनाचा प्रभाव वाढल्यामुळे हजारो प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आली आहेत. या ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून वस्तू, सेवा घरपोच देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये आता पालिकेला ‘अ‍ॅमेझॉन’ कंपनी धावून आली आहे. यामुळे कोरोना प्रसाराला आळा घालता येणार आहे. मुंबईकरांसाठी या महत्त्वाच्या उपक्रमात सहभागी होत असल्याबद्दल आनंद होत असल्याबद्दल अ‍ॅमेझॉन इंडियाच्या लास्ट माइल स्टोन ऑपरेशन्सचे संचालक प्रकाश रोचलानी यांनी सांगितले. यासाठी मुंबईकरांनी अ‍ॅमेझॉनवर आपली ऑर्डर नोंदवावी, त्यानंतर आम्ही डिलिव्हरी पॉइंट आणि त्यानंतर स्वयंसेवकांच्या मदतीने वस्तू ग्राहकांच्या घरी पोहोचवण्यात येतील अशी माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त जयश्री भोज यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या