
अमेरिकेतील टेक कंपनी ऍमेझॉनने कर्मचारी कपात सुरूच ठेवली असून कंपनीने पुन्हा एकदा 4 हजार 700 कर्मचारी कपात केल्याची माहिती दिली आहे. ही कर्मचारी कपात अमेरिकेतील न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, न्यूजर्सी, वॉशिंग्टन या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. यामध्ये 40 टक्के इंजिनीअर्सचा समावेश आहे. कंपनीने ऑक्टोबर महिन्यात 14 हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.
कंपनीने सध्या एआय, क्लाऊड आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस केला आहे. नवीन सीईओ अँड जेसी यांनी पदभार स्वीकारल्यापासून कर्मचारी कपातीवर लक्ष दिले आहे. कर्मचारी कपात करणारी ऍमेझॉन एकटी कंपनी नाही. 2025 मध्ये आतापर्यंत 231 टेक कंपन्यांनी जवळपास 1.13 लाख कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

























































