
अॅमेझॉन प्राइम शॉपिंग महोत्सव परत येत आहे आणि आपण या 48 तासांच्या भव्य प्राइम डे सेलदरम्यान ऑफर करण्यात येणाऱ्या सर्वोत्तम डिल्सचा लाभ घेऊ शकतात. सेलदरम्यान अनेक ऑफर्स सादर केल्या जातात, तसेच या सेल हंगामामध्ये स्टेशनरीप्रेमींसाठी त्यांच्या आवडत्या स्टेशनरीचा साठा वाढवण्याची संधी आहे.
नवनीत एज्युकेशन लिमिटेड अॅमेझॉन प्राइम डे सेलदरम्यान खासकरून 3 नवीन उत्पादने सादर करण्यास सज्ज आहे. ही उत्पादने आहेत – युवा कॉम्बो टू क्रिएट-1, युवा माय क्राफ्ट किट आणि एचक्यू ओनिक्स नोटबुक.
युवाची कॉम्बो टू क्रिएट-1 ही कलरिंग बुक-आधारित कृती आहे, जी तुमच्या लहान मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देईल. या किटमध्ये एक कलरिंग बुक, 12 बोल्ड वॅक्स क्रेयॉनचा पॅक आणि 5 ड्रॉईंग पोस्टर्स आहेत. युवाचा माय क्राफ्ट किट ही हस्तकलेची आवड असलेल्यांसाठी विशेष किट आहे. या किटमध्ये क्राफ्ट पेपर, ग्लू स्टिक आणि किड्स सिझर्स आहेत.
नवनीतचा एचक्यू ओनिक्स नोटबुक बाजारात आणत आहे. एचक्यू स्टेशनरी उत्पादने त्यांचा अद्वितीय दर्जा, अभिनव व सरलीकृत डिझाइन्स आणि प्रबळ उपयुक्तता या गुणांमुळे कामाच्या ठिकाणी लोकप्रिय आहेत. नवीन नोटबुकमध्ये ‘एक्स्पोज स्पाइन’ वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ असा की बुकच्या बाइडिंग भागावर कोणतेच आच्छादन नसण्यासोबत याची रचना करण्यात आली आहे. या वैशिष्ट्यासह कोणत्याही व्यत्ययाशिवाय पुस्तक 180 अंश कोनामध्ये उघडता येऊ शकते.
अॅमेझॉन प्राइम डे सेलदरम्यानच्या नवीन सादरीकरणांबाबत बोलताना नवनीत एज्युकेशन लिमिटेडचे संचालक शैलेंद्र गाला म्हणाले, ”नवनीत एज्युकेशन लिमिटेडने नेहमीच युजर्सना मूल्य देणारी नाविन्यपूर्ण उत्पादने व डिझाइन्स निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्राइम डे सेलसह ग्राहकांना आता त्यांच्या घरामधून बाहेर न पडता नवनीतमधील त्यांच्या आवडीची स्टेशनरी उत्पादने खरेदी करता येणार आहे.”



























































