चिपळूणात चोरट्यांनी ॲमेझॉन शॉप फोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
robbery

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

मुसळधार पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री चिपळूण शहरात दोन दुकाने फोडून लाखभर रुपयांचा माल लंपास केला आहे. चिपळूण येथील परशुराम नगर येथील ॲमेझॉन शॉप हे दुकान फोडले तसेच शेजारील इमारतीतील कुरीयरचे कार्यालय फोडून डल्ला मारला.

बुधवारी रात्री चिपळूणात मुसळधार पाऊस होता. त्यापावसाचा फायदा घेत चोरट्यांनी चिपळूणातील दोन दुकानाचे शटर उचकटून डल्ला मारला. रोकड आणि वस्तू चोरट्यांनी लांबवल्या.