अंबादास दानवेंनी सांगितलं विक्रमी विजयाचं रहस्य

1908
ambadas-danve-win

विधानपरिषदेच्या संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप महायुतीचे उमेदवार उमेदवार अंबादास दानवे यांनी 524 मतं घेत विक्रमी विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या अंबादास दानवे यांच्या या जबरदस्त परफॉरमन्समुळे विरोधक बुचकळ्यात पडले आहेत. शिवसेनाच्या या भव्य विजयाची सगळ्या महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे.

या निवडणुकीमध्ये एकूण 647 मते पडली होती. यातील शिवसेना भाजपची हक्काची अशी 292 मते होती. 35 ते 45 नगरसेवकांनी दानवे यांना आधीच समर्थन दिले होते. या सगळ्यांच्या एकूण मतांपेक्षा दानवे यांना 187 अधिकची मते मिळाली आहे. विजयानंतर अंबादास दानवे यांनी त्यांना मत देणाऱ्या सगळ्या मतदारांचे आभार मानले आहेत.

या विजयाचे रहस्य

अंबादास दानवे यांनी मिळवलेला विजय हा विक्रमी विजय आहे. या विजयाचे रहस्य सांगताना त्यांनी संपूर्ण श्रेय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलं. वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ‘बऱ्याच दिवसांनी फळ मिळालं हा विषय संघटनात्मक कामात नसतो. संघटनात्मक कामात एक प्रोसेस (प्रक्रिया) असते. पक्षनेतृत्व योग्यवेळी योग्य संधी देतं, तशी संधी मला मिळाली. मनानीय उद्धव साहेबांनी दिली आहे. त्यामुळेच हा विज मिळाला’.

पाहा व्हिडीओ :

चर्चा फक्त दानवेंच्या विजयाची आणि काँग्रेसच्या ‘अदृश्य हातांची’

 

आपली प्रतिक्रिया द्या