
मिंध्यांच्या मंत्र्यांनी मंगळवारी कॅबिनेटच्या बैठकीवर बहिष्कार घातला. त्यावरून सध्या मिंधे व भाजप मध्ये सुरू असलेले वाद आता चव्हाट्यावर यायला लागले आहेत. यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार अंबादास दानवे यांनी जोरदार टोला मिंधे गटाला लगावला आहे.
”भाजप व मिंधे दोघेही एक सारखे आहेत. भाजपने मिंधेंची अनेक लोकं पळवली तेव्हा त्यांना काही वाटलं नाही. पण ज्यावेळेस एकनाथ शिंदेंच्या चिरंजीवांच्या मतदारसंघात या गोष्टी घडल्या त्यामुळे या विषयावर एवढा गोंधळ झाला. शिंदेचे मंत्री आता शिंदेचंही ऐकत नाही. त्यांचे बॉस आता फडणवीस झाले आहेत. बऱ्याच जणांनी स्वत:च्या चुली केल्या आहेत”, असे अंबादास दानवे म्हणाले.
भाजपमध्ये गेल्यावर देशद्रोह्याचा देशप्रेमी होतो
सरकारच्या कृपेवर नवाब मलिक बाहेर आहेत. हेच भाजप, फडणवीस आमच्यावर आरोप करत होते की देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसणारे म्हणत होते. आता हेच देशद्रोही देशप्रेमी झाले आहेत. अजित दादांसोबत बसतात म्हणजे भाजपसोबत बसतात. स्वत:कडे आल्यावर देशद्रोह्याचा देशप्रेमी होतो. गुन्हेगाराचा संत होतो”, असे अंबादास दानवे म्हणाले.
आता फक्त पक्ष, राष्ट्राचं काहीही होऊ दे असं भाजपचं वर्तन
”पालघरमध्ये याच भाजपने साधू संतांवर हल्ला झाला म्हणून महाराष्ट्रात आंगडोंब उसळवला होता, त्याच प्रकरणातील मुख्य आरोपीला यांनी पक्ष प्रवेश दिला हे कोणतं हिंदुत्व आहे? आता तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणात याच भाजपने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. ही कोणती संस्कृती आहे. कोणतं प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष व नंतर व्यक्ती. आता फक्त पक्ष आणि व्यक्ती, राष्ट्राचं काहीही होऊ दे असं भाजपचं वर्तन झालेलं आहे”, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
चोर चोर सगळे भाई झालेले आहेत
पार्थ पवारबाबत बोलताना दानवे म्हणाले की, ”पार्थ पवारच्या अमेडिया कंपनीत त्यांचा स्वत:चा शेअर 99 टक्के आहे. याच्या चौकशी अहवालात त्यांचे नाव देखील नाही. पण यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सरकारी जमीन, महार वेतनाची जमीन विकता येते का? दाब दबाव टाकून तेजवानी यांनी पावर ऑफ अॅटर्नी कशी घेतली? त्याचा रेडी रेकनर रेट काढलेला का? मुद्रांक शुल्क कसा काढला? या प्रश्नांची उत्तरे समोर आली पाहिजे. या सगळ्या विषयात पार्थ पवार ज्या कंपनीचे संचालक आहेत त्याचं नाव येत नाही व ज्यांचे 1 टक्के शेअर असलेल्यांचं नाव येतो. भविष्यातही असेच सुरू राहिल. सरकारला भविष्यात हाच न्याय सर्वांना लावावा लागेल. पार्थ पवारला वाचवायचे कारण म्हणजे सगळ्यांचेच हात दगडाखाली आहेत. चोर चोर सगळे भाई झालेले आहेत




























































