अंबाजोगाई – लॉकडाऊनमुळे कलिंगड शेतातच पडून, शेतकरी हवालदिल

497

संचारबंदी, लॉक डाऊन, कोरोना व्हायरसची भीती अशा अनेक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची कलिंगड शेती हातची वाया गेली तोंडाशी आलेले पीक शेतात तसेच पडून राहिल्याने लाखो रुपयांना जबर फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मागणी मंदावल्याने व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतावर फिरकेनासे झाले आहे.

शेतकरी बांधवांना नगदी पीक म्हणून उपयुक्त ठरणारे कलिंगड मोठ्या प्रमाणावर आले आहे. नेमके विक्री करण्याच्या वेळीच देशावर संकट कोसळले. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशच ठप्प झाला. देशात सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले. जीवघेण्या कोरोना आजारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापारी ठप्प झाल्याने कवडीमोल किमतीला ही कलिंगडे कोणी घेण्यास तयार नाहीत. उठावच नसल्याने हे पीक शेतात तसेच पडून राहिले आहे.

लाखो रुपयांची आमदनी देणारे पीक शेतात पडून राहिल्याने शेतकऱ्याचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. फायदा होईल म्हणून शेतकऱ्यांनी कुणी एक एकर कुणी दोन एकर य कोणी चार एकर कलिंगड पिकाची लागवड केली. पीक उत्पादन चांगले आले आहे. मात्र, नेमके विक्री करण्याची वेळ आली आणि हा निसर्गाचा घाला आला. कोरोनामुळे हाहाकार उडाला सर्वत्र मार्केट थंड झाली. शेतकरी बांधवांच्या शेतावर येऊन घेऊन जाणारे व्यापारी कवडीमोल किमतीने घेऊ लागले. आठ दहा रुपये किलोने घेणारे चार पाच रूपये किलो मागू लागले आहेत. शेतकरी बांधवांना कलिंगडे तोडायला लावून घेऊन न जाणे अशा अनेक घटना घडल्या आहेत. परिणामी या हंगामात शेतऱ्यांना जबर फटका बसला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या