अमेरिकेत वर्षभरात 10 हजार हिंदुस्थानी ताब्यात

646

अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला तसेच जनसुरक्षेला बाधा ठरणाऱया तब्बल 10 हजार हिंदुस्थानींना गेल्या वर्षभरात ताब्यात घेण्यात आल्याचे अमेरिकन सरकारने एका अहवालात स्पष्ट केले. या 10 हजार हिंदुस्थानींपैकी 831 जणांना मायदेशी पाठवण्यात आले आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अमेरिकेच्या इमिग्रेशन ऍण्ड कस्टम्स एन्फोर्समेंट (आयसीई) विभागाशी संबंधित असलेला हा अहवाल मंगळवारी जारी करण्यात आला आहे. अमेरिकेत कायम राहण्यासाठी व्हीसा नसतानाही येथेच राहात असलेल्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या देशात धाडले जाते. अशा लोकांमध्ये हिंदुस्थानींची संघ्या 2015 ते 2018 या कालावधीत दुपटीने वाढली आहे. आयसीईने 2015 साली 3532 हिंदुस्थानींना ताब्यात घेतले होते. 2016 साली 3913 जणांना, 2017 मध्ये 5322 जणांना, तर 2018 साली 9811 हिंदुस्थानींना ताब्यात घेतल्याचे अहवालात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या