हिंदुस्थानी तरुणाचा विमानात दंगा? परदेशी नागरिकांवर हल्ला केल्याचा आरोप; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

 

अमेरिकेहून जर्मनीला जाणाऱ्या लुफ्थांसा एअरलाइन्सच्या एका विमानात मोठा गोंधळ उडाला. 28 वर्षीय हिंदुस्थानी तरुणाने विमानात दंगा करत दोन अल्पवयीनांवर फोर्कने हल्ला केला. तर एका क्रू सदस्याच्या कानाखाली मारण्याचा प्रयत्न केला.या घटनेमुळे विमानाला आपत्कालीन स्थितीत बोस्तान येथे लॅण्ड करावे लागले. त्यामुळे या प्रकरणात तरुण दोषी आढळल्यास 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 2 कोटी रुपये दंड होऊ शकतो. ही घटना शनिवारी शिकागोहून फ्रॅकफर्ट जाणाऱ्या विमानात घडली आहे. त्यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला .

प्रणीत कुमार उसिलिपल्ली असे तरुणाचे नाव आहे. त्याने 17 वर्षीय दोन मुलांवर हल्ला केला. जेव्हा विमानातील कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने त्याच्या बोटाने त्याच्याकडे पिस्तूल रोखले आणि ते तोंडात घालून ट्रिगर दाबण्याचा नाटक केले, ज्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. एका महिला प्रवाशाच्या कानशि‍लात लगावली आणि एका क्रू सदस्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी पूर्वी बायबल स्टडीजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व्हिसावर अमेरिकेत होता.मात्र तो कायदेशीररित्या आता राहू शकत नाही. अमेरिकन अॅटर्नी ऑफिसनुसार, त्याच्यावर धोकादायक शस्त्राने हल्ला करणे आणि शारीरिक इजा पोहोचवण्याच्या हेतूने आरोप ठेवण्यात आले आहेत. दोषी आढळल्यास त्याला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 2 कोटी रुपये दंड होऊ शकतो.