अमेय झळकणार हिंदी वेबसीरिजमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता अमेय वाघ आपल्या चाहत्यांना एका मागून एक आश्चर्याचे धक्के देत आहे. काही दिवसांपूर्वी अमेयने सोशल नेटकर्किंग साईटद्वारे, लककरच निगेटिक्ह भूमिकेतून झळकणार असल्याची माहिती दिली होती. या बातमीची चर्चा होत असतानाच त्याने आणखीन एका नव्या प्रोजेक्टबद्दल सांगत त्याच्या चाहत्यांना खूश करून टाकलं आहे.

अमेय लवकरच एका हिंदी वेबसीरिजमधून प्रेक्षकांसमोर येत आहे. डिंग इंटरटेंटमेंट निर्मित आणि अनिरुद्ध सेन दिग्दर्शित ‘असुरा’ असे त्याचे नाव असून वूट ऍपवर प्रदर्शित होणारी ही एक थ्रिलर गोष्ट आहे. विशेष म्हणजे अमेयची यात महत्त्वपूर्ण भूमिका असून तो पहिल्यांदाच अशा थ्रिलर वेबसीरिजमध्ये काम करताना दिसून येणार आहे. या वेबसीरिजमध्ये अभिनेता अर्शद वारसीची प्रमुख भूमिका आहे. ‘असुरा’ या वेबसीरिजच्या निमित्ताने अर्शदसोबत काम करण्याची संधी अमेयला मिळणार असल्याकारणामुळे तोदेखील खूप उत्सुक आहे.