गुलशन कुमारच्या भूमिकेत आता आमीर खान

774

सुभाष कपूर दिग्दर्शित गुलशन कुमार यांच्या बायोपिक ‘मोगुल’मध्ये आमीर खान गुलशन कुमार यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात काम करण्यास अखेर आमीरने होकार दिला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आमिरने ट्विट करून ‘मोगुल’मध्ये काम करणार नसल्याचे म्हटले होते. पण आता तो या चित्रपटाशी पुन्हा जोडला गेला आहे.

दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्या विरोधात सहा वर्षांपूर्वी एक प्रकरण सुरू होते. ‘मी टू’मुळे या प्रकरणाला वाचा फुटली. त्यामुळे आम्ही थोडे गोंधळात सापडलो होतो, असे आमीर म्हणाला. कपूर यांच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत त्यांच्यासोबत काम करण्यास आम्ही सुरुवात केली आहे, असेही त्याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या